ब्रेकिंग

कसमादेच्या वाघिणीने प्रभाग क्रमांक28 मध्ये केली विजयाची हॅट्रिक.

सर्वसामान्यांची माय प्रतिभा माय. केलेल्या कामाची पावती.

नासिक जनमत   प्रभाग क्रमांक 28 चे भाजपच्या उमेदवार  प्रतिभा पवार यांनी प्रभाग क्रमांक 28 मधून केलेल्या कामाच्या जोरावर हॅट्रिक  केलेली आहे. त्यांच्यावर सध्या अभिनंदनचा वर्षाव मतदारांचा व नातेवाईकांचा चालू आहे.

 गेल्यात दोन टर्म मध्ये त्यांच्या प्रभागांमध्ये त्यांनी विकासाची गंगा आणली. डीजीपी नगर दोन ते बुरकुले लॉन्स हा दोन किलोमीटर चा रस्ता डांबरीकरण केला. त्यामुळे या परिसराला नवे वैभव निर्माण करण्यात त्यांना यश आले. सर्व मतदारांची प्रतिभा पवार माय असल्याने प्रभागातील समस्या साठी अधिकाऱ्यांना धारेवर धरून प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यासह त्यांचे पती मुलगा आबा पवार हे 24 तास प्रयत्न करून समस्या सोडवतात.

सर्वसामान्य व कामगारांचा हा प्रभाग असल्याने या प्रभागा तील नागरिकांना  आपल्या कुटुंबासारखे लक्ष द्या देत असतात. त्याच मतदान रुपी आशीर्वादाने त्यांचा विजय झालेला आहे. एकीकडे धनशक्ती तर दुसरीकडे संयम नम्रता शांती आणि मतदारांच्या ऐकून घेणे व समस्या सोडवणे या जोरावर त्यांनी हा विजय मिळवल्याचे प्रतिभा पवार सांगतात. मी केलेल्या विकास कामाची पावती म्हणून मला भाजप सर्वश्रेष्ठ ने तिकीट दिले व मी विजय मिळवून त्यांचा विश्वास सार्थक केला.

 

 

 

 2022 मध्ये करोनाची  साथ चालू असताना  स्वतःच्या जीवाची परवा न करता अनेकांना नवे जीवदान दिले. दवाखान्यात ऍडमिशन साठी स्वतः जाऊन रूम उपलब्ध करून दिले. लॉकडाऊन असल्याने अनेक मतदारांवर उपासमारीची वेळ आल्याने स्वतः अन्न धान्य पुरवले. करोना काळामध्ये  अनेक जण घरात बसल्या असता नां प्रतिभाताई पवार या कोरोनाच्या रुग्णांबरोबर दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना उपचार करण्यास भाग पाडत होत्या. व रुग्णांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत होते.

 प्रभागातील नागरिकांनी फक्त मलाच एक नगरसेवक म्हणून निवडून दिले नाहीतर घरातील माझ्याबरोबर दोन नगरसेवक माझे पती व मुलगा यांना प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी  निवडून दिलेले आहे. आपल्या प्रभागात नागरिकांच्या पाण्याच्या समस्या रस्त्याच्या समस्या मी सोडवल्या असून येणाऱ्या काळामध्ये नवीन पाईपलाईन द्वारे चौथ्या मधल्यापर्यंत मोटर न लावता पाणी नक्कीच जाईल यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. प्रतिभा पवार या कसमादे च्या वाघीण आहेत ही वाघीण बोलते तेच करते असे एका ज्येष्ठ नागरिकांनी नाशिक जनमत  शी बोलताना सांगितले.  त्यांचा विजय झाला. नंतर मतदारांनी त्यांची विजय रॅली काढली. गेल्या तीन दिवसापासून त्यांच्यावर नातेवाईक व मतदारांचा अभिनंदनचा वर्षाव चालू आहे.

 नागरिकांनी आपल्या समस्या साठी केव्हाही फोन करा. तुमच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी मी व माझा परिवार नेहमी हजर असेल. मतदारांचे आभार मानताना प्रतिभा पवार यांनी सांगितले. त्यांचा निसटता विजय हा एका वाघिणीचा विजय झालेला आहे. शेर कभी बुढ्ढा नही होता. ओ शेर ही रहता है. प्रभागाचा विकास  हाच माझा ध्यास असून त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. असे त्यांनी सांगितले.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे