प्रभाग क्रमांक 7 मध्ये सुरेश पाटील, योगेश हिरे, हिमगौरी आडके, स्वाती भामरेंना पसंती
रॅली द्वारे शक्तिप्रदर्शन ठरले मतदारांमध्ये आकर्षण. प्रभागात विकासाची गंगा आणणार

प्रभाग क्रमांक 7मध्ये सुरेश पाटील, योगेश हिरे, हिमगौरी आडके, खाती भामरेंना पसंती
नाशिक | जन्मत प्रतिनिधी
प्रचाराच्या अखेरच्या
दिवशी प्रभाग क्र. ७ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ निघालेल्या भव्य बाइक रॅलीने प्रभाग भाजपमय झाल्याचे चित्र संपूर्ण गंगापूर रोडसह गोदावरील नदीलगतच्या परिसरात पाहायला मिळाले. सर्वांना सोबत घेऊन प्रभागात विकासाची गंगा आणणारे एक चारी उमेदवार असल्याने त्यांना प्रभागात मोठ्या प्रमाणात पाठिंबा उपस्थिती मिळत आहे राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्याने मोठ्या प्रमाणात निधी प्रभागात आणून विकास करण्याचे ताकद फक्त या उमेदवारांकडे असल्याने चारी उमेदवारांना मतदारांची पसंती आहे

भाजपची विकास निती, स्वच्छ कारभार, जनहिताचे निर्णय आणि योजना तसेच प्रभाग ७ मधील भाजपचे सुसंस्कृत, सुशिक्षित व चारित्र्यवान उमेदवार सुरेश आण्णा पाटील, योगेश (मुन्ना) हिरे, हिमगौरी आहेर-आडके आणि स्वाती भामरे प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास आमदार सीमा हिरे आणि आमदार देवयानी फरांदे यांनी

व्यक्त केला. तुळजाभवानी मंदिर येथून सुरू झालेली बाईक रॅली प्रभागाच्या कानाकोपऱ्याला स्पर्श करुन गेली. सर्वत्र मतदारांकडून उमेदवारांचे आणि रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत झाले. रॅलीमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. मतदारांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा व्यक्त केला. प्रभाग क्रमांक सात मध्ये चारी उमेदवारांचा विजय होईल असे मतदारांमध्ये चर्चा आहे.



