हिरावाडीत हरिनाम सप्ताहास प्रारंभ. मान्यवरांच्या उपस्थितीत विना ध्वज पूजन .
हिरावाडीत हरिनाम सप्ताहास प्रारंभ
मान्यवरांच्या उपस्थितीत वीणा अन् ध्वज पूजन
नाशिक :
श्री वरद विनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हिरावाडीतील पाटालगत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास शुक्रवार दि. १८ मार्चपासून प्रारंभ झाला. दी.२५ मार्चपर्यंत होणाऱ्या सप्ताहात रोज सकाळी चार ते सहा काकड आरती , सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हरिकीर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
पहिल्याच दिवशी सकाळी वीणा व ध्वजपूजन महाराष्ट्र राज्य अपंग संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे व नगरसेवक रुची कुंभारकर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी रामनाथ महाराज शिलापुरकर, एकनाथ सांगळे, कैलास महाराज वेलजाळी, ज्ञानेश्वर सोमाशे, मधुकर सुर्यवंशी, विष्णु कुडके आदी उपस्थित होते. सप्ताहात पहिल्या दिवशच्या दत्ताजी महाराज वाघ, (इगतपुरी) यांचे किर्तन झाले. ट्रस्टतर्फे विविध धार्मिक आणि समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. दर एकादशीला मंदीरात भजनांचा कार्यक्रम घेण्यात येतो. सप्ताह यशस्वीतेसाठी दिलिप मोकळ, सागर नाईक, किशोर खैरनार, मंगला देवरे, रामदास चंद्रहास, विष्णु कुडके, मधूकर सुर्यवंशी यांच्यासह वरदविनायक मंदिर कार्यकारी समिती, सप्ताह मंडळ, साईराज मित्रमंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
चौकट
यांची होणार हरिकिर्तन…..
सप्ताहात पंढरीनाथ महाराज डांगे, ( नाशिक), एकनाथ महाराज कुमावत (नाशिक), गिताताई घोरवडकर, (घोरवड), चेतन महाराज बोरसे, (मालेगांव), शारदाताई सुर्यवंशी,( नाशिकरोड), रामनाथ महाराज शिलापूरकर ( शीलापुर) यांचे किर्तन होईल. तर दि. २५ रोजी सकाळी १० वाजता कैलास महाराज वेलजाळी यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप होणार आहे.
नाशिकः हिरावाडीत हरिनाम सप्ताहात वीणापूजनप्रसंगी अपंग संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांचा सत्कार करतांना कैलास महाराज वेलजाळी.