महाराष्ट्र
औरंगाबाद येथे एम आय डी सी वाळूज येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सांगता.
नाशिक जनमत औरंगाबाद प्रतिनिधी *दि.१६/0३/२०२२ रोजी ५१व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहची सांगते निमित्त बक्षीस वितरण सोहळा, जागतिक महिला दिन व आजादी का अमृत महोत्सव शुभारंभ अशा या त्रिवेणी कार्यक्रम आनंदात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्रीराम दहिफळे उपस्थित होते.मे.IPCA लॅब्रोट्रीज लिमिटेड, वाळूज औरंगाबाद येथे उपस्थिती.या कार्यक्रमाास अनेक मान्यवर उपस्थित होते यात आवर्जून श्री महेश भालेकर , उपसंचालक, मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख श्री व्यंकट मैलापुरे, युनिट हेड श्री संजय चौबे,डॉ. पंकज बलदोटा, श्री गिरीधर श्री निलेश त्रिवेदी, श्री भागीनाथ गोरे,श्री सचिन पोतदार आदी मान्यंवर उपस्थित होते. यावर्षी IPCA व्यवस्थापनाने श्री वेंकट मैलीपुरे साहेबांच्या संकल्पनेतून “गजर कीर्तनाचा-जागर सुरक्षेचा” व “नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी” अर्थात “नाचू कीर्तनाचे रंगी सुरक्षा दीप लाऊ जगी” या संत वचनाप्रमाणे विविधतेतून एकता प्रदर्शित करतभक्तिमय वातावरणामध्ये सोहळा पार पडला.