सात वर्ष अकरा महीने च्या अशुल ने केले आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर सर
7 वर्ष 11 महिन्यांच्या अंशुल ने केले आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर सर
नाशिक येथील पिता-पुत्राची ऐतिहासिक कामगिरी
टीम 360 एक्सप्लोरर मार्फत दोघांनी फडकवला किलीमांजारो शिखरावर तिरंगा
कुत्रीम ऑक्सिजनशिवाय किलीमांजारो शिखर सर करणारा जगातील सर्वात लहान मुलगा
*टांझानिया (आफ्रिका)* अंशुल काळे व वैजनाथ काळे या नाशिक येथील पिता-पुत्राने अनोखी कामगिरी करत इतिहास घडवला असून 7 वर्ष 11 महिन्यांच्या अंशुल ने हे शिखर कुत्रीम ऑक्सिजनशिवाय सर केले आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर द्वारे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत महाराष्ट्राच्या या सुपुत्राने इतिहास घडवत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करून मोहीम यशस्वी केली आहे. 18 मार्च रोजी सकाळी 8.15 वाजता या बापलेकाने किलीमांजारो शिखरावर भारताचा तिरंगा फडकावून विश्वविक्रम केला आहे.
आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. अतिशय खराब वातावरणात शून्याच्या खाली तापमान, गोंगावत वाहणारे वारे, उभी चढण, पडणारा बर्फ या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी 13 मार्च रोजी सुरवात केली होती. असा आगळावेगळा व देशाला अभिमानास्पद विक्रम केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
गेली अनेक वर्षे शारीरिक कसरती व फिटनेस प्रशिक्षण देणारे VDK स्पोर्ट्स फाऊंडेशन चे संचालक वैजनाथ काळे यांनी अनेकांना व्यायामाची आवड लावली आहे. त्याशिवाय राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू महाराष्ट्राला दिले आहेत. 360 एक्सप्लोरर या देशातील सर्वात प्रभावी साहसी मोहिमा आयोजित करणाऱ्या कंपनीसोबत ही मोहीम यशस्वी करून संपूर्ण देशापुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
येत्या काळात अंशुल काळे 360 एक्सप्लोररच्या माध्यमातून युरोप व ऑस्ट्रेलीया खंडातील सर्वोच्च शिखर सर करणार आहे व सेव्हन समिट करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
*अंशुल काळे( सर्वात लहान गिर्यारोहक)*
सुरवातीला खराब वातावरणामुळे भीती वाटली होती. पण हे शिखर सर केले. आई-वडील व सर्वांच्या सपोर्टमुळे ही मोहीम पूर्ण करू शकलो.
*वैजनाथ काळे( गिर्यारोहक, अंशुल चे वडील )*-
माझ्या मुलासोबत किलीमांजरो मोहिमेत भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी मी आतुर होतो. सर्वात लहान वयात अंशुल ने कुत्रीम ऑक्सिजनशिवाय ही मोहीम केली हे माझ्यासाठी खूप मोठी बाब होती. सर्वाना आश्चर्यचकित करत अंशुल माझ्याशी पुढे शिखरावर अंशुल पोहचला. शिखरावर मी खूपच भावूक झालो होतो. अतिशय अवघड वातावरणात आम्ही ही मोहीम पूर्ण केली याचा खुप अभिमान वाटत आहे. आनंद बनसोडे व 360 एक्सप्लोरर च्या योग्य नियोजनामुळे ही मोहीम यशस्वी झाली.
*आनंद बनसोडे (CEO, 360 एक्स्प्लोरर)*–
- अंशुल व वैजनाथ काळे यांनी जे यश संपादन केले आहे त्याचा सर्वाना अभिमान आहे. 360 एक्सप्लोररच्या माध्यमातून 7 वर्ष, 11 महिन्यांचा अंशुलने भारतीयांना अभिमानास्पद कामगिरी यांनी केली आहे. अतिशय प्रतिकूल वातावरणात त्यांनी जी चढाई केली आहे त्याला कशाची तोड नाही. 360 एक्स्प्लोरर च्या माध्यमातून अनेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्यांना अश्या मोहिमांमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9067045500 | 9067035500 वर संपर्क करावा.