भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशअध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी दिली बजेटवर प्रतिक्रिया.

- नाशिक जनमत अर्थसंकल्प प्रतिक्रिया*
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत माननीय अर्थमंत्र्यांनी सादर केला. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक दृष्ट्या अग्रेसर असे राज्य असताना सुद्धा तसेच देशाच्या एकूण जीडीपीच्या 20 टक्के वाटा महाराष्ट्राचा असताना आणि एकूण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 13 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. तसेच जीएसटी कलेक्शनमध्ये जवळपास पंधरा टक्के कलेक्शन हे महाराष्ट्रच देत असतो तरी या राज्य सरकारने उद्योग-व्यापार कामगार यांच्यासाठी कोणतीही योजना दिली नाही.
विजेच्या दरांमध्ये उद्योगांना सवलत मिळेल असे वाटले होते परंतु असलेली सवलत सुद्धा या सरकारने बंद केली. करोना काळामध्ये छोटे व्यापारी , दुकानदार , सूक्ष्म व लघु उद्योजक, महिला उद्योजक यांना प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागले त्यांना त्याही काळात कोणती मदत केली नाही आणि आज सुद्धा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. युवा वर्गाला ही निराश केले आहे.मला वाटतं वसुलीच्या नादात यांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे. एकूणच काय तर या अर्थसंकल्पात कोणताही अर्थ नाही असेच म्हणावे लागेल .
प्रदीप पेशकार ,
प्रदेशाध्यक्ष ,
भाजपा उद्योग आघाडी