श्री शेत्र भगवानगड च्या विकासासाठी घोगस पारगाव करांची एक कोटी 13 लाख रुपयांची देणगी
नाशिक जनमत .चंद्रकांत धात्रक यांच्याकडून
श्रीक्षेत्र भगवानगड च्या विकासासाठी पारगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील गावकऱ्यांनी एक कोटी 13 लाख रुपये देणगी स्वरूपात विकासासाठी मदत दिली सालाबादाप्रमाणे यावर्षी ही घोगस पारगाव येथे काल्याचे किर्तन व हरिनाम सप्ताह सांगता चे कीर्तन श्री ह भ प न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांचे होते गावातील भाविकांच्या विनंतीला मान देऊन यांचे काल्याचे किर्तन झाले यावेळी हजारो भाविक उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते धार्मिक व उत्साही वातावरणामध्ये हा सपत्याहचा कार्यक्रम पार पडला. यावेळेस समस्त गावकऱ्यांनी गावाच्या वतीने एक कोटी 13 लाख रुपये अकरा हजार पाचशे रुपये देणगी जमा करून नामदेव शास्त्री महाराज यांच्या चरणावर अर्पण केली या प्रसंगी घोगस पारगाव करांचे प्रेम पाहून श्री क्षेत्र भगवानगड मंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी आपल्या कीर्तनातून ग्रामस्थांना व भगवान भक्तांना भरभरून आशीर्वाद दिले अजूनही बाहेरगावी असलेले भाविक जून महिन्यामध्ये मोठी मदत देणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात व आनंदात पार पडला