प्रभाग एकमध्ये यंदाही कमळचं – मतदारांचा निर्धार प्रभाग एक मध्ये भाजपाचा झंझावाती प्रचार
प्रभाग एकमध्ये यंदाही कमळचं – मतदारांचा निर्धार
प्रभाग एक मध्ये भाजपाचा झंझावाती प्रचार

पंचवटी नासिक जनमत प्रतिनिधी
विकासाची अविरत परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रभाग एकमध्ये यंदाही कमळा समोरील बटन दाबून भाजपालाच निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी प्रचार दौऱ्यात व्यक्त केला. प्रभाग क्रमांक एक मधील भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचार दौरा दिंडोरी रोड परिसरातील विविध कॉलनी परिसरात संपन्न झाला. भाजपाचा झंझावाती प्रचार पाहून नागरिकांनी यंदाही विजय निश्चित असल्याची भावना व्यक्त केली .
प्रभाग एक मधील प्रचार दौऱ्याची सुरवात आकाश पेट्रोल पंप येथून करण्यात आली त्यानंतर सावरकर गार्डन, गीता नगर, स्नेह नगर, वृंदावन नगर, हरिहर नगर, फिटनेस सोसायटी, गुलमोहर नगर या मार्गावर प्रचार दौरा पार पडला. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी चारही उमेदवारांचे स्वागत करत महिलांना औक्षण केले. परिसराचा होत असलेला विकास बघता चारही उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार व विजयाचा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.
यावेळी प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार रूपाली स्वप्निल ननावरे, रंजना पोपटराव भानसी, दिपाली गणेश गीते, अरुण बाबुराव पवार यांसह सतीश वावीकर, मनोज बाग, आर डी कुलकर्णी, सिताराम पवार, श्याम धनगर, अशोक जाधव, विलास हटकर, वंदना भोसले, शितल कासलीवाल, रोहिणी दळवी, सविता गावित, सोनाली पवार व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट

भाजपाच्या चारही उमेदवारांचे पारडे जड
गेली अनेक वर्ष भाजपाचा बालेकिल्ला असलेला प्रभाग क्रमांक एक मध्ये यंदाही भाजपाच्या चारही उमेदवारांचे पारडे जड असल्याची भावना मतदारांकडून व्यक्त केली जात आहे. प्रभागाचा सातत्याने होणारा विकास, अनुभवी व सुशिक्षित उमेदवार यामुळे गेल्या अनेक वर्षाचे विकासाचे सातत्य कायम ठेवण्यासाठी भाजपाचे चारही उमेदवार निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केल्याने भाजपाचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे


