सिटीलिंक बसचे अपघात वाढले. सिटीलिंक बसची पिकअपला धडक
सिटी लिंक बसच्या अपघातांमध्ये वाढ सिटीलिंक बसची पिकअपला धडक.
नासिक : सिटीलिंक
शहर वाहतूक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने पिकअपला धडक दिल्याची घटना शनिवारी (दि. ६) घडली. यावेळी पिकअप पलटी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पिक अपमधील औषधांच्या मालाचे नुकसान झाले. त्र्यंबक नाका सिग्नलजवळील पिनॅकल मॉलसमोर शनिवारी पहाटे जि.प. कडून सातपूर एमआयडीसीकडे जाणाऱ्या सिटीलिंक बसने (एमएच १५ जीव्ही ५३५५)
औषधांचे पार्सल घेऊन जाणाऱ्या मालवाहू पिकअपला (एमएच १५ एफव्ही ६२०१) धडक दिली. रस्त्यावर सर्वत्र आ ईल झाले त्यामुळे काही काळ या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी रस्त्यावर घसरून नागरिक पडत होते. पोलीस प्रशासनातर्फे ताबडतोब माती टाकून रस्ता व्यवस्थित करण्यात आला. दरम्यान
पिकअपसह आतील मालाचे मोठे नकसान झाले. याबाबत
पिकअप चालक सूरज दत्तू भांगरे (रा. हनुमानवाडी) यांनी दिलेल्या माहितीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.