मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन*

*नाशिक, दि. 13 जन्मत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन यांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वागत केले.
यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा, नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आदी उपस्थित होते.
