मित्राचा वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या मित्रांच्या भरधाव कारचा अपघात एक ठार चार जखमी.

नाशिक | जन्मत प्रतिनिधी काल पार्टी पाच वाजेच्या दरम्यान मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या युवकांच्या गाडीला अपघात झाला यामध्ये चार जण जखमी व एक मित्र ठार झाले आहे. काल पहाटे


मित्राचा वाढदिवस साजरा करून – घरी परतणाऱ्या पाच मित्रांच्या कारचा सीबीएस चौकात भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटून सागर शिंदे ती दुभाजकासह झाड, इलेक्ट्रिक पोलला आदळली. यात सागर शिंदे (३५, रा. पिंपळनारे, ता. दिंडोरी) याचा मृत्यू झाला तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भद्रकाली
पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या मित्राचा वाढदिवस साजरा करून बुधवारी (दि. १२) मध्यरात्री अडीचच्या सुमारास कारमालक सागर शिंदे चार मित्रांसह एमएच १५ जेएच
८७८२ या कारने परतत होते. सुदाम सोनवणे (२८, रा. भुसे, ता. निफाड) हे कार चालवत होते. सीबीएस सिग्नलकडून शालिमारच्या दिशेने जात असताना सुदाम यांचे भरधाव कारवरील
नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकातील झाडे, पथदिपावर आदळून पलटली, पुढे इलेक्ट्रिक पोल, पिंपळाचे झाड, डीपीवर आदळून विजेच्या पोलमध्ये अडकली. मागील सीटवर झोपलेले सागर शिंदे यांना जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात साहिल कोरणे, सुदाम सोनवणे, कानिफनाथ मंगळूर, विवेक खालकर, अक्षय गोर्ते हे जखमी आहेत. वाहनचालक सुदाम सोनवणेसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सागर शिंदे यांच्या

पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर. सागर शिंदे यांच्या नातेवाईकांमध्ये घटनेविषयी संभ्रम दिसून आला. सागर शिंदे अतिशय कष्टातून त्याने आपला परिवार उभा केला होता. त्याच्या अचानक जाण्याने त्याचे आई-वडील परिवार शोकाकुल झालेले आहेत.