पंचवटीतील आयुर्वेद रुग्णालयातील चोरी करणारे तीन चोर ताब्यात. नासिक जनमत न्युज पेपर न्युज चैनल न्यूज पोर्टल. माध्यमातून नाशिक शहर व जिल्ह्यातील बातम्या दाखवत असतात. नाशिक जनमत न्युज चैनल लाईक व सबस्क्राईब करा. बातमीसाठी संपर्क 9273020944
पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी.
नाशिक जन्मत पंचवटी परिसरातील मखमलाबाद म्हसरूळ परिसरामध्ये घरफोडी सोनसाखळी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलिसांना हे चोर सापडत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान काल पंचवटी पोलिसांनी नाशिक पंचवटी येथील आयुर्वेद रुग्णालयाच्या औषध भांडार विभागात अॅल्युमिनियमचे झाकण चोरणाऱ्या तीन संशयितांना २४ तासांच्या आत अटक करण्यात आली. मयूर जाधव (रा. हिरावाडी), जितेश उर्फ गुड्डू फसाळे, संदीप कनोजिया (रा. गणेशवाडी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनुसार,
संशयित हिरावाडी येथे असल्याची माहिती डीबी पथकाचे कुणाल पचलोरे यांना मिळाली, पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, संपत जाधव, महेश नांदुर्डीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान पंचवटी पोलिसांनी म्हसरूळ मखमला बाद. व नवीन वसाहती कडे व्यस्त वाढावी अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.