ब्रेकिंग

सिन्नर मधील चापडगाव 65 वर्षीय महिलेने पकडले दोन साखळी चोर. भिमाबाईच सर्व सरातून कौतुक

सिन्नर मध्ये 65 वर्षीय वृद्धीने दोन सून साखळी चोरांना पकडले. दिला चोप

नासिक जनमत  नाशिक शहरासह जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरांचे प्रमाण वाढले आहे. काल सिन्नर मधील  चापडगाव येथे रस्त्यावरून जाणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेस गॅरेज कुठे आहे, असे विचारत तिच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या दोघा चोरट्यांना त्या महिलेने प्रसंगावधान दाखवत जमिनीवर लोळवल्याची घटना तालुक्यातील चापडगाव येथे घडली. चापडगाव  शिवारात राहणाऱ्या भिमाबाई  शिवराम आव्हाड मंदिरात दिवा लावण्यासाठी पायी जात होत्या. त्याचदरम्यान अकोलेकडून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भामाबाईस जवळ पंक्चर दुकान आहे का, असे विचारले. त्यांना बोलण्यात गुंतवून पाठीमागे बसलेल्या

 

संशयित आरोपी

चोरट्याने त्यांच्या गळ्यातील पोत आणि मंगळसूत्र हिसकावले. मात्र, प्रसंगावधान दाखवत भामाबाईंनी दुचाकी पकडून ठेवत आरडाओरड केली. यामुळे चोरट्यांची धांदल उडाली. झटापटीत दुचाकी खाली पडल्याने चोरटे पळू लागले. भामाबाई यांनी एकााचा पाय पकडून ठेवला. त्या झटापटीत त्यांनाही दुखापत झाली. बाजूच्या शेतांतील शेतकऱ्यांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेत चोप दिला. नांदूरशिंगोटे पोलिसांनी प्रथमेश भावदास वैष्णव व त्याचा दुसरा साथीदार

 

यास ताब्यात घेतले आहे अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहे. दरम्यान 65 वर्षीय भिमाबाईंचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महिलांनी आता सतर्क राहील पाहिजे. आपली सुरक्षा आपणच केली पाहिजे. या घटनेतून वृद्ध असून देखील तरुणायला देखील  लाजवेल अशी हिम्मत भिमाबाई यांनी दाखवली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे