बोलठाण येथील उर्दू शाळेला शिक्षक मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांच आंदोलन
बोलठाण येथील उर्दू शाळेला शिक्षक मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे आंदोलन
गट विकास अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून आंदोलन तात्पुरते मागे
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील उर्दू शाळेच्या शिक्षिका तांबट शाईनअली मोहंमद ह्या शिक्षिका जुलै २०१९ पासून शाळेत गैरहजर असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. तसेच शाळेतील विद्यार्थी संस्था घटली आहे, याबाबत पंचायत समितीला तक्रारी अर्ज दाखल केले. परंतु शिक्षिका तांबट ह्या हजर झाल्या नाहीत.
त्याचप्रमाणे मुख्याध्यापक अमिनोद्दीन शेख यांनी
पालकांना विश्वासात न घेता आपल्या मर्जीने शालेय शिक्षण समिती गठीत करुन शाळा सुधारने साठी जमा असलेला पंचवीस हजार रुपयांचा अपहार केला. तसेच तांबट शाईन अली यांच्या पतीसोबत संगनमत करुन पालकांना अंधार ठेउन शिक्षिका गैरहजर असले बाबत त्यांनी वरीष्ठ अधिकार्यांना कळविले नाही. व शिक्षिका तांबट अली गैरहजर असतांना त्यांच्या हजेरी पुस्तकात सह्या घेऊन त्यांना मुख्याध्यापक शेख यांनी हजर दाखवल्यामुळे तांबट अली घरी बसून वेतन घेत आहेत. मुख्याध्यापक शेख यांनी शालेय अनुदानाचा वेळेवर वापरले नसल्याने शासनास परत गेले, व मुख्याध्यापक शेख यांनी महिला शिक्षिकेने पतीच्या मदतीने स्वताला वाचवण्यासाठी खोटे आरोप करुन बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तरी घडलेला प्रकार गंभीर स्वरुपाचा असुन मुख्याध्यापक व महिला शिक्षिकेवर दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करुन उपोषण सुरू करण्यात येईल निवेदन देण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांसह बोलठाण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक पठाण आरिफ शेख, सैय्यद इद्रिस, युनुस सैय्यद अफज पठाण प्रहार संघटनेचे अनिस शेख आणि पालकांनी गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्यासोबत चर्चा करुन तात्पुरते आंदोलन मागे घेतले.