ब्रेकिंग

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे शिवजयंती आनदी मय वातावरणात साजरी

  • छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासनाच्या निर्देश प्रमाणे साजरी

ग्रामविकास अधिकारी गैरहजर राहत असल्याने नागरिक नाराज

 

अरुण हिंगमीरे

जातेगाव, नांदगाव

 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव शासनाच्या निर्देशानुसार साजरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सभोवताली उत्सव समितीच्या वतीने स्वच्छता करुन आकर्षक विद्युत रोषणाई करुन व फुलांनी सुशोभीकरण करुन तसेच आतिषबाजी करुन साजरी करण्यात आली.

प्रत्येक महापुरुषांच्या जयंती उत्सव ग्रामपालीकेच्या वतीने साजरा करण्यात येतो मात्र येथील ग्रामविकास अधिकारी शरद मोहिते हे प्रत्येक जयंती उत्सवाच्या वेळी गैरहजर राहत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली.

 

मिरवणूकीला परवानगी मिळाली नसल्याने जयंती उत्सवास जागेवरच प्रथम गावातील आजी माजी सैनिकांच्या  वतीने महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतीमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली. नंतर ग्रामपालीकेचे पदाधिकाऱ्यांसह सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि हिंदू मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी जयंती उत्सवात सहभाग नोंदविला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवराय या घोषणांनी परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. सायंकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जयंती उत्सव रौद्रशंभो युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिवजयंतीच्या निमित्ताने येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यांचे देखील पुजन करण्यात आले.

शिव जयंती उत्सवाच्या निमित्त ग्रामपालीकेच्या वतीने, तसेच येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालयात व गंगाराम धनसिंग राठोड संस्थेच्या साईज्ञान मंदिर या विद्यालयात आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यां विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे