ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने पंचायत समिती समोर उपोषण.
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने पंचायत समिती समोर उपोषण
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
नाशिक जनमत नांदगाव तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ४५११ यांच्यावतीने गुरुवार रोजी पंचायत समिती कार्यालय नांदगाव समोर शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांपैकी ऑगस्ट २०२० च्या तरतुदीनुसार किमान वेतनाचे अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांचा थकित भत्ता मिळावा, भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा, जिल्हा परिषदे कडून असलेल्या वेतनाच्या हिस्या व्यतिरिक्त ग्राम पालिकेचा हिस्सा टाकून वेतन त्वरित देण्यात कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावे, तसेच कर्मचाऱ्यांना विमा सर्व संरक्षण मिळणे इत्यादी मागण्यांसाठी शासनाने परिपत्रक काढून ग्रामपंचायतींना आदेश दिलेले असताना देखील ग्रामपंचायत स्थानिक प्रतिनिधी तसेच ग्रामसेवक दुर्लक्ष करीत असल्याने वरील उपोषण करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज धिवर, तालुका अध्यक्ष लीलाधर अहिरे, उपाध्यक्ष रतन गायकवाड, कार्याध्यक्ष सुभाष पगारे, सचिव सोपान खिरडकर, यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास आधिकारी विलास सनेर, विस्तार अधिकारी व्हि. के. ढवळे यांनी उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन सर्व ग्रामसेवकांनी मार्च अखेरपर्यंत शासनाच्या आदेशानुसार मंजूर झालेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करणे बबत आदेश देण्यात येईल. तरी सुद्धा मार्च अखेरपर्यंत आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आपण पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकतात असे विस्तार अधकारी v.k. ढवळे यांनी सांगितल्या नंतर उपोषणाची सांगता करण्यात आले.