ब्रेकिंग

दाडेगाव शिवारात बिबट्या मृत अवस्थेत. शासकीय नियमाप्रमाणे बिबट्याचे दहन

नाशिक जनमत    17 जुलै 2026 रोजी सकाळी मौजे दाढेगाव येथे श्री. अंकुश भोर यांच्या मालकी गट नंबर 05 मध्ये वन्यप्राणी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. तात्काळ जागेवर पोहोचून मृत बिबट्यास ताब्यात घेतले व पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून शवविच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आले.

(मृत्यू अवस्थेत वन्य प्राणी या दिवसात जास्त का मिळतात याची देखील चौकशी होणे महत्त्वाचे आहे. अनेक भागांमध्ये रानडुक्कर मोर तरस बिबटे इत्यादी प्राणी मोठ्या प्रमाणात झाली असून पेरणीच्या दिवसांमध्ये अनेक वन्य प्राणी मूर्त अवस्थेत मिळण्याची संख्या वाढलेली आहे )

 

सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय अधिकारी, नाशिक यांनी शवविच्छेदन केले. सदर बिबट्या नर असून (अंदाजे वय 4 ते 5 वर्षे) अंतर्गत संसर्गामुळे फुफ्फुसामध्ये रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले. हेच मृत्यूचे कारण असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत आहेत. शासकीय नियमाप्रमाणे बिबट्याचे दहन करण्यात आले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे