समशान भूमी मध्ये अंत्यसंस्कारा साठी तयारी. मृत व्यक्ती खोकला..
त्रंबकेश्वर परिसरामध्ये नागरिक आश्चर्यचकित.
प्रतिनिधी
|
नाशिक जन्मत
चार दिवसांपूर्वी अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला पहिले ग्रामीण रुग्णालयात नंतर जिल्हा रुग्णालयात व शेवटी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन दिवसांच्या उपचारांनंतर तो ब्रेन डेड झाल्याचे सांगण्यात आल्याने नातेवाइकांनी त्याला पुन्हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावी नेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र त्यावेळी खोकला आल्याने तो जिवंत असल्याचे लक्षात येताच पुन्हा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येतीची माहिती नसल्याची ग्रामीण भागातील रहिवाशांची स्थिती आणि वैद्यकीय उपचारांबाबत रुग्णालयांची अनास्था या दोन्ही गोष्टी यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. हजारात असा एक प्रकार घडत असतो. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये हॉस्पिटल विषयी सभ्रम निर्माण झालेला आहे. हॉस्पिटल मधून पेशंट जाताना संपूर्ण माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना सांगणे महत्त्वाचे झाले आहे. डॉक्टरांची परवानगी नसताना तरुणांच्या नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी नेत असल्याचे डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी सांगितले.
. तर सिविल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी सांगितले की हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने त्यांना डॉक्टर वसंत पवार मेडिकल हॉस्पिटलमध्ये उत्तरासाठी स्थलांतर केलं होतं. सध्या रुग्ण सिविल हॉस्पिटल येथे उपचार घेत असून त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे