वालदेवी’त वाहणाऱ्या दोघांना वाचवणाऱ्या तरुणाचे होते कौतुक.
‘वालदेवी’त वाहणाऱ्या दोघांना वाचवले बापू जाधवने पाण्यात उडी मारून एक जण वाचवले. तर दुसऱ्यास नागरिकांनी दोर टाकून वाचवले.
नाशिक : गेल्या दोन चार दिवस मुसळधार पडलेल्या पावसामुळे नदीन नाले वाहध आहे त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक वाहून गेल्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना काल पाथर्डी परिसरातील
दाढेगाव येथील वालदेवी नदीवरील पूल पावसाळ्यात धोकादायक ठरत आहे. या मार्गावरून गावकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग दररोज प्रवास करत असतात. परंतु हा पूल धोकादायक असून या ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिकच्या संसरी गावातील दोन तरुण पाथर्डीकडे जात होते. संजय बारकू गोडसे हा दुचाकीवरून पूल पार करत असताना पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे पुलावरून घसरला आणि नदीत वाहून जात होता. यावेळी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी त्याला पाहिले. त्यावेळी गावातील बापू जाधव आणि राजाराम पवार यांनी
पाण्यात उड्या मारत गोडसे याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. तर दुसऱ्या तरुणास ग्रामस्थांनी दोर टाकून चार-पाच जणांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले. या घटनेत जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे हा पूल किती जास्त धोकादायक आहे या फुलांचे रुंदीकरण होणे महत्त्वाचे आहे. दररोज हजारो लोक या पूलांनी येजा करतात. दरम्यान गावकरी व बापू जाधव या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनी नाले किंवा पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना धोका पत्करू नये. आपली स्वतःची काळजी घ्यावी.