वास्तुदोष सांगत भोंदू पूजाऱ्याने लुटले; हातचलाखीने लांबविले १७ तोळे सोने.
मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
वास्तुदोष सांगत भोंदू पूजाऱ्याने लुटले; हातचलाखीने लांबविले १७ तोळे सोने
प्रतिनिधी | नाशिक
वास्तुदोष असल्याचे सांगून कुटुंबियांना सुवर्णपूजा करण्यास भाग पाडत भोंदू पुजाऱ्याने सोन्याचे १७ तोळे दागिने लांबवल्याचा प्रकार तिडके कॉलनीत घडला. त्याच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिडके कॉलनीतील अंजली तिडके यांच्या जावयाचा पटेल नामक मित्र त्यांच्याकडे आला. ‘मी तंत्रविद्या जाणतो, बाहेरचे बघतो. मला या घरात वास्तुदोषाचा वास येतोय, तुम्हाला
सुवर्णपूजा करावी लागेल,’ असे तो म्हणाला. विश्वास संपादन केल्यावर, पूजा करण्याचे ठरवले.त्याने ‘तुम्ही सोने १० दिवस तांदळात ठेवा, सोने ठेवलेला डबा उघडू नका’, असे सांगितले. तिडके यांनी १७ तोळे सोने असलेला डबा संशयिताच्या ताब्यात दिला. त्याने पूजा केली. घरातील मंडळी घरातून दुसऱ्या घरात गेल्यावर हात चलाकिने सोने काढून डब्बा रिकामाच ठेवला. असा संशय व्यक्त होत आहे दरम्यान तो पंधरा दिवसांनी येतो म्हणून सांगितले परंतु तो
परतलाच नाही. तिडके कुटुंबियांनी डबा उघडून पाहिला असता त्यातील दागिने गायब होते. या प्रकरणी त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
त्याने घरातील महिलेला देवापुढे दिवा लावण्यास पाठवले. विवाहित मुलीला पाणी आणण्यास सांगितले. तेव्हा खोलीत तो एकटाच होता. तिडके दिवा लावून आल्या, मुलीने पाणी दिले. संशयिताने सोन्याचा डबा लाफ्टवर ठेवण्यास सांगितला आणि काही वेळाने तो निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा आलाच नाही. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळब उडाली.