संतोष शेळके यांची राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार शहराध्यक्ष पदी नियुक्ती.

संतोष शेळके यांची राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार शहराध्यक्ष पदी नियुक्ती
नाशिक जनमत(दि.२१ एप्रिल २०२५) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंघटित कामगार नाशिक शहराध्यक्ष पदी संतोष शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांनी संतोष शेळके यांना नियुक्ती पत्र दिले आहे. संतोष शेळके यांनी नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील श्रमिक व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रीय काम केले आहे. तसेच सामाजिक कार्यात देखील त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग आहे. कामगारांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी केलेले कार्य बघता संतोष शेळके यांची असंघटित कामगार नाशिक शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात फिरून कामगार व श्रमिक वर्गाला सोबत घेऊन संतोष शेळके पक्ष संघटना मजबूती करिता आपले योगदान देतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संजय खैरनार व शहर-जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी संतोष शेळके यांचे अभिनंदन करून भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.