सिन्नर येथे शेततळ्यात पडून 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू.
नाशिक जनमत . प्रशांत काकडे यांच्याकडून सिन्नर तालुक्यातील खंबाळे ची तरुणी पाय घसरल्याने शेततळ्यात बुडून अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली सोनल भाऊसाहेब आंधळे असे मृत तरुणीचे नाव आहे ती तीन दिवसांपूर्वीच कल्याण वरून गावी आली होती खंबाळे येथे भाऊसाहेब आंधळे हे आपली पत्नी मंदाकिनी मुलगा व मुलगीयाच्या राहत असून शेती करतात त्यांचे शेत असून रविवारी सकाळी सातच्या सुमारास भाऊ साबळे मुलगी सोनल मुलगा विशाल व पुतण्या सोबत पोहण्यासाठी शेततळ्यावर गेले होते सोनल पोहता येत नसल्याने ती तळ्याकाठी बसून आनंद घेत होती पोहणे झाल्यावर बाकीची मुले तळ्यावरुन निघून गेली व सोनल आणि भाऊसाहेब काही वेळ तळ्यावर बसून होते त्यानंतर तळ्याच्या कडेने चालत असताना तिच पाय घसरला आणि ती शेततळ्यातबुडू लागली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेततळ्यात उतरून सोनलला पाण्याबाहेर काढले व खासगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला भाऊ साहेब यांनी नांदुर-शिंगोटे पोलीस दूर क्षेत्रात जाऊन घटनेची माहिती दिली आहे पोलीस अधिक तपास करत आहे