राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता.
सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेले आहे त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे दरम्यान आज अंदमान निकोबार मध्ये मान्सूनचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे दरम्यान याचा परिणाम म्हणून काल परभणी व इतर ठिकाणी काही प्रमाणात पाऊस देखील झाला दरम्यान हवामानाने दिलेल्या अंदाजानुसार 16 ते 20 तारखेपर्यंत सोलापूर कोल्हापूर सांगली नांदेड परभणी इत्यादी जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडू शकतो. यावर्षी मान्सूनचं आगमन लवकरच होत आहे दरम्यान काल दिल्लीमध्ये तापमान 49 सेंटीग्रेड पर्यंत होते महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तसेच बद्रीनारायण केदारनाथ उत्तरांचल प्रदेश मध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुसळधार पाऊस झाला तर उकाड्या पासून नागरिकांना गारवा मिळण्याची शक्यता आहे दरम्यान काही प्रमाणामध्ये वाळवा चा पाऊस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कालपासून पडत आहे परभणी मध्ये भर उन्हामध्ये जवळपास अर्धा पाऊस झालाअसल्याचे वृत्त आहे.