ब्रेकिंग

नक्षलवाद्यांनी आयईडीने उडवली लष्कराची गाडी; ९ मृत्युमुखी

छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी आयईडीने उडवली लष्कराची गाडी; ९ मृत्युमुखी

 

 

 

जिल्हा राखीव दलाचे जवान मोहिमेवरून परतताना लक्ष्य.

 

स्फोटाने १० फूट खड्डा, कारच्या ठिकऱ्या

 

 

 

छत्तीसगडमध्ये नक्षलींनी सोमवारी बिजापूर जिल्ह्यातील अंबेली गावात लष्कराच्या वाहनांना लक्ष्य करताना आयईडी स्फोट केला. त्यात ८ जवान शहीद झाले. हल्ल्यात एका कारचालकाचाही मृत्यू झाला. नक्षलींचा गेल्या दोन वर्षांतील सुरक्षा दलावरील हा सर्वात मोठा हल्ला आणि २०२५ चा पहिला हल्ला आहे. सर्व जवान जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) होते.

शनिवारी अबुझमाड येथे ५ नक्षलींचा खात्मा केल्यानंतर ते एसयूव्हीने दंतेवाडा येथील छावणीकडे परतत होते. डीआरजी ही राज्य पोलिस दलाची शाखा आहे. यात स्थानिक समुदायातील लोक व शरणागती पत्करलेल्या नक्षलींचीच भरती केलेली असते.

पोलिस महासंचालक सुंदरराज सित म्हणाले, अंबेली गावाजवळ दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा शक्तिशाली स्फोट झाला. घटनास्थळी १० ते १२ फूट रुंद खड्डा पडला आहे. लष्करी वाहनांच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत. जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न स्थितीत आढळून आले आहेत

 

. कारचा एक भाग ३० फूट अंतरावर लटकलेल्या स्थितीत होता. दंतेवाडा भागात २६ एप्रिल २०२३ रोजी हल्ला झाला होता. त्यात १० पोलिसांचा मृत्यू झाला होता.

 

 

 

 

अबुझमाडहून परतताना जवान बेदरेपर्यंत पायी आले. नंतर नाला ओलांडून वाहनांत बसले. नक्षलींनी आधीच सिंगल रोडवर ४० ते ५० किलो आयईडी स्फोटके पेरली होती. म्हणूनच गाडीच्या इंजिनासह इतर सुटे भाग ४०० मीटर दूर विखुरलेले होते. नक्षलवाद्यांनी 40 ते 50 किलो स्फोटक लावले होते. घटन गंभीर होती. मृत्यू देहाचे. अवशेष दूरपर्यंत पसरले होते. घटनास्थळावर 10  फुटापर्यंत खड्डा पडला होता.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे