आपली लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी:-संजय पवार महिरावणी येथील पाटील विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन.
आपली लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी:-संजय पवार
महिरावणी येथील पाटील विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन
नाशिक: प्रतिनिधी
देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे,असे प्रतिपादन विद्यालयाचे सामाजिक शास्त्रे विषयशिक्षक संजय पवार यांनी केले.
महिरावणी येथील मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे हे होते.यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब सोनवणे,देवेंद्र देवरे, संजय गायकवाड,सुरेखा भामरे, अश्विनी चौरे,दिपाली वाडीले,खंडू लांबे,दिलीप खांडबहाले, विलास येवले आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांनी प्रास्ताविकात मतदानाचे महत्त्व सांगत कुटुंबातील सदस्यांना मतदान करण्यासाठी जागृती करावी असे आवाहन केले. तसेच यावेळी लोकशाहीत मतदानाचे महत्त्व,मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य,मतदान जनजागृती या विषयावर इयत्ता नववी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी निबंध,चित्रकला,वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शिक्षक-शिक्षकेतर तसेच सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली.यावेळी सर्वांचे विद्यालयाचे उपशिक्षक देवेंद्र देवरे यांनी आभार मानले.
महिरावणीन येथील मातोश्री गि.दे. पाटील विद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेताना शिक्षक व सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी