लोकशाही दिनाचे 7 फेब्रुवारी रोजी आयोजन
लोकशाही दिनाचे सोमवारी 7 फेब्रुवारी रोजी आयोजन
भागवत डोईफोडे
नाशिक जनमत नाशिक
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती सभागृह येथे करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने शासनाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय लोकशाही दिनच्या अंमलबजावणीसाठी 26 सप्टेंबर 2012 च्या शासन परिपत्रकातील निकषांनुसार पाठविण्यात येणारे अर्ज विहीत नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. याकरीता चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता पाठविण्यात येणारे अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत सादर करावे, तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी, तालुका लोकशाही दिनानंतर 1 महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा लोकशाही दिनात अर्ज सादर करावेत, असेही निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व किंवा अपिल्स, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रति न जोडलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असेही शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे