महाराष्ट्र

सातपूर पोलीस ठाण्यात महेंद्र चव्हाण यांची पुनहा नियुक्ती.

नाशिक जनमत. नाशिक शहरांमधील सातपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून परवा औद्योगिक वसाहतीतील महेंद्र सोना कंपनी जवळ दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणातील पाचही आरोपी अजून सापडले नसून. सातपूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या एका दिवशी करण्यात आले आहे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण व गुन्हे निरीक्षक सतीश घोटेकर यांच्यातील मतभेदामुळे बदली झाल्याचे सूत्राच्या अहवालाच्या मुळे समजते. गोळीबारात जखमी झालेल्या तपन जाधव यांच्या मज्जात तुला गोळी लागून ती पोटाकडील बाजूस अडकली होती त्यामुळे त्याच्या कमरेखाली अर्धांग वायूचा झटका आला असून त्याची हालचाल होत नाही तसेच डोक्यावर पाच टक्के टाकण्यात आले असून होळी शरीरातून बाहेर काढण्यात आली आहे असे डॉक्टर सदेश चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान काल संध्याकाळी आईला बेशुद्ध करत तीन महिन्याच्या मुलीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्याचे काम चालू होते. आई व मुलगी घरात एकटे असताना पंजाबी ड्रेस मध्ये आलेल्या महिलेने तीन महिन्याच्या मुली च्या तोंडाला व आईच्या तोंडाला रुमाल लावून बेशुद्ध करून मुलगी दुर्वाशी तिचा गळा चिरून खून केला दरम्यान आई शुद्धीवर आली असून लवकरच तपास लागेल असे सांगण्यात येत आहे या दोन्ही घटनेने सातपूर व नाशिक हादरले असून नाशिकला सिंघम पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी असे नागरिकांतर्फे बोलल्या जात आहे दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी असुरक्षितता बनत आहे धार्मिक व मंदिराचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकची गुन्हेगारी क्षेत्राकडे वाटचाल जोराने वाढू लागले आहे मंत्र भूमी कडून यंत्र भूमीकडे जाणाऱ्या या शहरात गुन्हेगारी लवकरात लवकर थांबवणे महत्वाचे झाले आहे दररोज कुठेतरी गाड्या फोडणे शाळेत कॉलेज पुढे भाईगिरी वाढली असून पोलीस मात्र मोटरसायकल व चार चाकी वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात मग्न आहेत. लवकरात लवकर गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी सिंघम पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे नाशिककर बोलत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे