आरोग्य व शिक्षण

सर्प – विंचू दंशाने दगावलेल्यांचा कुटुंबाच्या सहाय्यतेसाठी आर्थिक मदतीचा हात मिळवा .या साठी निसर्ग विज्ञान संस्था प्रयत्नशील.

: – सर्प – विंचू दंशाने दगावलेल्यांचा कुटुंबाच्या सहाय्यतेसाठी आर्थिक मदतीचा हात मिळवा .या साठी निसर्ग विज्ञान संस्था प्रयत्नशील.

नाशिक जनमत  वैभव कुलकर्णी डोंबिवली यांच्याकडून  निसर्ग विज्ञान संस्था , डोंबिवली ( रजि . क्र . महा / ४७ / ०४ ठाणे ) ही सन १९९० सलापासून या क्षेत्रात सरीसृप वर्गातील सर्प , पक्षी , प्राणी किंवा इतर ( वन्यजीव ) रेस्क्यू किंवा रिहॉबिलोटेशन साठी कार्यरत आहे .
वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १९७२ चे कलम ११ ( ब ) अंतर्गत तरतुदीनुसार मानवी जीवितास विशेष करुन धोकादायक ठरणाऱ्या सरीसृप वर्गातील विषारी प्रजाती अनुसूचीत २ ते ४ मधील (भाग- २) नाग , घोणस. ( भाग – ४ ) मण्यार , फुरसे , विंचू सर्पाच्या संबंधीत सोमवार , दि. १५ ऑक्टोबर २००७ रोजी उपवनसंरक्षक ( वन्यजीव ) विभाग ठाणेचे ( D . F . O ) मा . श्री . सरफराज खान साहेब व काही सेवाभावी संस्थेचे सर्पमित्र यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती . त्या बैठकीत बरेच विषय झाले . त्यात सर्प – विंचू दंशाचा विषय झाला होता . त्या मुद्यावरून आम्ही निसर्ग विज्ञान संस्थेने असे ठरवले की आम्ही ठाणे जिल्ह्यात किती सर्प- विंचू दंश होतात याचा आपण सर्व्हे करायला सुरुवात केली . त्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या .
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सर्प – विंचू यांच्या दंशाने जगभरात सव्वालाख व्यक्ती बाधित होऊन उपचाराअभावी मृत्यू पावतात. जवळपास २७ लाख व्यक्तींना गंभीर अपंगत्वही येण्याची शक्यता असते . भारताची आकडेवारी पाहता दरवर्षी २ लाख व्यक्तींना साप चावतो ( ५० हजार रुग्णांचा उपचार अभावी मृत्यू होतो ) त्यापैकी महाराष्ट्र राज्य मध्ये ३५ हजार व्यक्तीला सर्पदंश होतो . शासन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालयातून मोफत उपचार सुविधा उपलब्ध असून बाधीत व्यक्तीवर उपचार करुन सुध्दा संपूर्ण महाराष्ट्रात सर्प – विंचू दंशाने मोठ्या प्रमाणात व्यक्ती दगावतात असे निदर्शनास येते .
आमच्या माहिती प्रमाणे बाजूच्या राज्यामध्ये ( उदा ० कर्नाटक , ओरिसा , पंजाब , बंगाल , राजस्थान , केरळ , मध्य प्रदेश इत्यादी ) राज्यात सर्प – विंचू दंशाने व्यक्ती बाधित / मृत झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निमार्ण होऊन अशा बाधित कुंटूबीयांवर उपासमारीची वेळ येते . अशा अपघात ग्रस्त कुंटूबीयांना सहाय्यतेसाठी आर्थिक मदतीचा हात मिळतो मग ह्या राज्यात का नाही ?
शेतकरी जनता अपघात विमा योजना ही कृषी विभागाने सुरु केलेली आहे . तथापि मदत योजनेचा फायदा फक्त शेतकरी वर्गासच ज्याचा ७ / १२ चा उतारा असेल त्यास किंवा त्याच्या रक्तातील एक नातेवाईक त्यास मिळणार आहे . पण शेतात राबणारा शेत मजूर किंवा वनात राबणारा वनमजूर त्यांना किंवा कोणी त्याच्या शेतात फिरावयास गेले त्याला सर्प – विंचू दंशाने मृत्यू झालास त्याला अपघात विमा योजनेपासून वंचित राहावे लागेल . परिणामी कोणतीही शासकीय मदत मिळत नाही .त्यामुळे ७ / १२ ही अट शिथिल करण्यात यावी .
शासनाचे प्रमुख या नात्याने उपरोक्त विषय व संदर्भान्वये निसर्ग विज्ञान संस्था डोंबिवली तर्फे
सविनय सादर की , आमच्या संस्थे कडील दि . ०१ /०४ /२०२१ , दि . २५ / १२ / २०१९ रोजी मा . श्री . भगतसिंह कोश्यारी राज्यपाल यांना सविनय माहिती साठी सादर केले . दि . ०५ / ०८ /२०१९ , दि . ०१ / ०१ /२०१८ , दि . १० /०८ / २०१६ , दि . १९ / ०८ /२०१५ , दि . २८ / ०३ / २०१४ , दि . ०७ / ०३ /२०१४ , दि . २३ / ०१ / २०१३ , दि . २८ /०३ /२०१२ , दि . ०५ /०२ /२०११ , दि . १३ /०९ / २०१० यांना मा . मुख्यमंत्री , मा . वनमंत्री , मा . कृषी मंत्री , मा . आरोग्य मंत्री , मा . आदिवासी विकास मंत्री , मा . मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय , मुंबई . आणि मा . केद्रीय पर्यावरण मंत्रालय , भारत सरकार , न्यु दिल्ली यांना रोजीच्या पत्रांन्वये आम्ही वरील विषयाचे अनुषंगाने इतर सर्व घटनांवर सर्वकष उहापोह करुन सविस्तर अहवाल सादर केला आहे . तरी आमच्या स्तरावरुन सातत्याने लेखी पाठपुरावा करीत आहोत .या बाबत शासना कडून कोणताही ठोस लेखी स्वरुपी निर्णय आज दिनांक पावेतो झाला नाही . त्यामुळे आम्ही या लोकोपयोगी उपक्रमांचा सहानुभूतीपूर्वक निश्चितच विचार करावा त्यासाठी जनतेच्या हितासाठी ऑड अनुराग कुलकर्णी यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली . परंतु सदर जनहित याचिकेवर प्रभावी मुख्य न्यायमूर्ती महोदय , श्री . संजय गंगापुरवाल सरांनी यांनी याचिकाकर्त्यांची मागणी राज्य सरकारने विचारात घ्यावी अशी शिफारस केली असून याचिका निकाली काढली आहे .
वरील सर्व बाबींचा साधक बाधक विचार करुन . या लोकोपयोगी उपक्रमांचा सहानुभूतीपूर्वक निश्चितच पणे विचार करावा व केलेल्या कार्यवाहीची माहिती आम्हास लेखी स्वरुपात अवगत केल्यास आम्ही आपले ऋणी राहु .
कळावे , सरकारने लवकरात लवकर महाराष्ट्रात देखील सर्पदंश व विषारी प्राण्यांनी चावा घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीं च्या कुटुंबांना इतर राजय प्रमाणे मदत करावी अशी मागणी निसर्ग विज्ञान संस्थेने केले आहे

वैभव कुलकर्णी
(मोबाइल ९८६९६३५५५८)
निसर्ग विज्ञान संस्था , डोंबिवली

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे