स्टँड अप इंडिया योजनेचा नवउद्योजकांनी लाभ घ्यावा* *: देविदास नांदगावकर*
*स्टँड अप इंडिया योजनेचा नवउद्योजकांनी लाभ घ्यावा*
*: देविदास नांदगावकर*
*नाशिक, दिनांक: 6 नोव्हेबर, 2023 ( वृत्त)*:
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत केंद्र शासनाची स्टँड अप इंडिया योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी राबविण्यात येते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी या योजनेतून उपलब्ध होणाऱ्या मार्जिन मनीचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
स्टँड अप इंडिया योजनेच्या लाभासाठी नवउद्योजक अर्जदार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असणे आवश्यक असून महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत कर्ज मंजूर झालेले असावे. स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी 10 टक्के हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंन्ट एण्ड सबसिडी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येते.
इतर अटी व शर्ती तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पूलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. असेही सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नाशिक श्री. नांदगावकर यांनी कळविले आहे.