नाशिकचे विशाल मराठे ‘शायनिंग स्टार टॅलेंट हॉनर-2023’ पुरस्काराने सन्मानित
- नाशिकचे विशाल मराठे ‘शायनिंग स्टार टॅलेंट हॉनर-2023’ पुरस्काराने सन्मानित
नाशिक दि.२३ (प्रतिनिधी) : नाशिकचे समाजशील व उद्यमशील सामाजिक कार्यकर्ते विशाल मराठे यांना ‘युनीकोर्न वर्ल्ड रेकॉर्ड्स’ कडून २०२३ चा ‘शायनिंग स्टार टॅलेंट हॉनर-2023’ पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे.
‘युनीकोर्न वर्ल्ड रेकॉर्ड्स’ ही ऑर्गनायझेशन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या गुणात्मक, सृजनात्मक आणि कार्यशील कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांना प्रसिद्ध करत असते. विशाल मराठे यांनी गेल्या १५ वर्षापासून सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवर काम करत आपल्या समाजसेवेने विकास घडवला आहे. त्यांचे विविध प्रकारचे सामाजिक कार्य जसे की, आदिवासी खेड्यापाड्यात जाऊन तिथल्या वस्तीतील लोकांची कोरोना काळात सेवा करणे, वृक्षारोपन, गोरगरिबांना मदत करणे यासारखी अनेक विधायक कामे पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ते सध्या विधी महाविद्यालयात विधी चे शिक्षण घेत आहेत. नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमिताने ७६ फुटी तिरंगा फडकवण्यात आला आहे.
या वेळी सामांन्यासाठी न्याय व संविधानच्या रक्षणासाठी मोठी चळवळ उभी करणार असल्याचे नाशिक जनमत प्रतिनिधींशी बोलताना विशाल मराठे यांनी सांगितले की. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.