आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न दुष्काळ सदृश्य परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी अधिकार्यांना केल्या सुचना
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
दुष्काळ सदृश्य परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी अधिकार्यांना केल्या सुचना
अरुण हिंगमिरे
पत्रकार जातेगांव
नांदगाव नाशिक
नांदगाव तालुक्यावर चालू वर्षी वरुन राजा रुसल्याने जेमतेम झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकरी बांधवांनी महागा-मोलाचे विविध पिकांची लागवड केली परंतु अपेक्षित पाऊस झाला नसल्याने उगवलेले पिके देखील करपू लागली आहे. शेतकरी बांधवांचे खरीप हंगामातील पिकांचे जवळपास नुकसान झाल्यात जमा झाले आहे. त्यातच तालुक्यातील नागरिकांचा आणि जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
अनेक दिवसांपासून शेतकरी राजा पावसाकडे आस लावून बसला असून पाऊस नसल्यामुळे तो हवालदिल झाला आहे, अजून पंधरा दिवस पाऊस पडला नाही तर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावें लागू शकते या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून दि. १८ शुक्रवारी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी
नांदगाव येथे शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे तालुकास्तरीय सर्व विभागांच्या मुख्य अधिकारी वर्गांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.
अपुरा मॉन्सूनमुळे निर्माण पीक परिस्थिती, नगरपालिका व ग्रामीण भागातील पाणी पुरवठा, नागरिकांच्या आणि जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी चारा छावण्या, शासकीय योजनांचा लाभ घेतांना नागरिकांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना, पीकविम्या बाबत अहवाल तयार करणे, तालुक्यातील धरनात आणि पाझर तलावात पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी सदर पाणी आरक्षित करणे.
चर्चेदरम्यान येणारे इत्यादी अनुषंगिक विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. व या वेळी येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहण्यास सूचना आ.कांदे यांनी या प्रसंगी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि इतर सह कर्मचारी, मनमाड आणि नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता व इतर अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे विविध खाते प्रमुख, महसूल विभागातील इतर अधिकारी, उप अभियंता बांधकाम विभाग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि अधिकारी दोन्ही नगरपालिकेचे विविध खाते प्रमुख, पोलिस निरीक्षक, तसेच उपस्थित अधिकार्यांना दिल्या. व निसर्गचक्र आपल्या हातात नसले तरी येणाऱ्या काळातील संकटांवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने हिरीरीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोरोणाच्या महामारीमध्ये सर्वांनी मिळून एकजुटीने काम केले,महामारी सोबत मुकाबला केला त्यापेक्षाही भयंकर परिस्थिती आपल्या समोर येवू घातली आहे. परमेश्वराकडे माझी एकच मागणी आहे, माझ्या तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडु दे शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येवू दे, समोर वाढुन ठेवलेले संकट टळु दे करतो अशी प्रार्थना करतो
असे आ. कांदे म्हणाले. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बंडू पाटील, आणि सर्व संचालक, माजी सभापती तेज कवडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, राजेंद्र पवार, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सुर्यवंशी, गुलाब पाटील, आणि सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.