व्ही एन नाईक शिक्षण संस्थेची निवडणुक बिनविरोध करा.* – दत्तु बोडके
*व्ही एन नाईक शिक्षण संस्थेची निवडणुक बिनविरोध करा.* – दत्तु बोडके
नाशिक जनमत(. ) व्ही एन नाईक शिक्षण संस्थेची निवडणुक जाहीर झालेली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटनीस, विश्वस्त, महिला व संचालक अशा एकुण २९ मतदान दि.२७ जुलै रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत होणार आहे. आत्तापर्यंत ६०० उमेदवारी अर्ज विक्री झालेले आहेत. थोर स्वातंत्र्य सेनानी,५ वेळा नाशिक जिल्ह्यामधुन आमदारकी, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणुन भुमिगत राहुन इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारे वंजारी समाजाचे नेते क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या नावाने उदयास आलेल्या या वंजारी समाजाच्या एकमेव शिक्षण संस्थेची निवडणुक बिनविरोध करावी, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी एकजुटीचे पाहिलेले स्वप्न पुर्ण करावे व एक आदर्श पायंडा पाडावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दत्तुभाऊ बोडके व ज्येष्ठ नेते महेश आव्हाड यांनी पत्रकानुसार केले आहे. सद्यस्थितीत चार पॅनल होणार असे दिसतेय. त्यात कोंडाजीमामा आव्हाड व मा. आ. बाळासाहेब सानप यांचे एक, हेमंत धात्रक व तानाजी जायभावे यांचे एक, पंढरीनाथ थोरे यांचे एक व मनोज बुरकुले व अभिजित दिघोळे यांचे असे चार पॅनल असुन त्या चार पॅनलच्या उमेदवारांपेक्षा कितीतरी पटीने जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
तथापि महाराष्ट्रातील जाती पातीचे गढुळ झालेले वातावरण, मराठा व ओ बी सी समाजाचे आरक्षनावरून सुरू असलेले आंदोलने या सर्व पार्श्वभूमीवर सर्व वंजारी समाजाने एकत्र यावे, वंजारी समाजाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन ही निवडणुक बिनविरोध करण्याकरीता कसोशीने प्रामाणिक प्रयत्न करावे, त्याकरिता समाजातील ज्येष्ठांचा लवाद नेमावा व या लवादाने सर्व इच्छुक असलेल्या उमेदवारांमधुन सर्वसमावेशक नावे नावे काढून योग्य तो निर्णय द्यावा. तो निर्णय सर्व इच्छुक उमेदवारांनी मान्य करावा व एक आदर्श पायंडा पाडून राज्यात एक चांगला संदेश जावा म्हणुन ही निवडणुक बिनविरोध करावी असे आवाहन बोडके व आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान ही निवडणुक बिनविरोध होत असेल तर सर्वप्रथम मी दोन्ही जागांवरील माझी उमेदवारी मी मागे घेईल असे मत कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार यांनी म्हटले आहे. तसेच ज्येष्ठ नेते महेश आव्हाड यांनीही सहमती दर्शवत तर मी सुध्दा बिनविरोध प्रक्रियेत माघार घेईल असे म्हटले आहे.