ये रिश्ता क्या कहलाता है सिरीयल मधील अभिनेत्री वैशाली ठक्कर ने गळफास घेऊन केली आत्महत्या.
नाशिक जनमत टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने काल इंदूरमध्ये आपल्या राहत्या घरामध्ये सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. त्यामध्ये जुन्या मित्रामुळे त्रास होत असल्याची उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी इंदूरमध्ये आपल्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली सूत्राने सांगितले की सुसाईट नोट मध्ये तिने जुन्या मित्रामुळे त्रास होत असल्याचा उल्लेख केला आहे आसपासच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर साईबाग परिसरातील तिच्या घरचा दरवाजा उघडला आणि ती खोलीत छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली तिला एमवाय रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी तपासून तिला मृत्यू घोषित केले पोलिसानुसार पो डायरी सापडली आहे यात सुसाईड नोट लिहिली आहे ये रिश्ता क्या कहलाता है तून कॅरिअरला सुरुवात करणाऱ्या वैशाली ठक्कर ने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे वैशाली उज्जैन जिल्ह्यातील म्हीद पुरची रहवासी होती