आई वडील हेच खरे आपले दैवत. ह भ प अण्णासाहेब आहेर
*आई-वडील हेच आपले खरे दैवत-आण्णासाहेब आहेर हिसवळकर*. नाशिक – पंढरपूर येथे भक्त पुंडलिकाने आईवडीलांची मनोभावे एकनिष्ठ सेवा केली म्हणुन गोकुळातून देव पंढरपुरी भेटावयास आला.तो आजही विटेवर उभा राहून साक्ष देतो,आपणही प्रत्येक परिवारातील मुलामुलीने आपले घरातील माता पित्याची सेवा करुन आदर्श घ्यावा, कारण आई वडील हेच आपले दैवत आहे, असे विचार वारकरी महामंडळ नाशिक अध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे प्रवचन प्रसंगी व्यक्त केले.माणसाला वागतांना मानेला वाक,समाजात नाक व आईवडीलांचा धाक असावा, ती मुले मुली जगात यशस्वी होऊन सुखी होतात, असेही आहेर महाराज शेवटी म्हणाले. ते वै. सुमनबाई संपतराव बस्ते यांना श्रद्धांजली वाहताना शिंदवड येथे बोलत होते. पुणेगांवचे हभपश्री सुकदेव पाटील यांनी ही वारकरी भजनी असलेले हभपश्री बापू बस्ते यांच्या मातोश्री ने कष्टातून परिवार उभा केला, समस्त दिंडोरी तालुका वारकरी भाविक बस्ते परिवाराचे दुःखात सहभागी आहोत,असे म्हटले आहे. हभपश्री पंढरीनाथ बस्ते यांच्या भावजई चे नुकतेच निधन झाले,त्यांचे पाठीमागे दोन मुले रावसाहेब बस्ते, हभपश्री बापू बस्ते, सौ.सिंधुबाई रावसाहेब दिवटे,सौ.मंगल शांताराम पालखेडे,सौ.संगिता सतिष कुयटे या तीन मुली आहेत पुतणे पुतण्या,नात नातु असा मोठा परिवार आहे. याप्रसंगी महिला वारकरी भजनी मंडळ सातपूर अध्यक्षा हभप सौ.सुमन बाळासाहेब शिंदे, शिंदवडच्या सरपंच सौ.लताबाई माधव बस्ते, पोलिस पाटील सुदाम गाडे उपसरपंच श्री सोपान उत्तमराव बस्ते,चेअरमन श्री पंजाबराव बस्ते,बजरंगबली भजनी मंडळाचे अध्यक्ष हभपश्री गोविंद आहेर, रघुनाथ बस्ते,भाऊसाहेब मोरे,अशोक गाडे, भास्कर पवार, आनंदा बस्ते, हभपश्री पंढरीनाथ बस्ते सुरेश गाडे, भाऊसाहेब गाडे, बाळासाहेब गाडे, जिवनेश्वर काळुबाबा आश्रम भजनी मंडळ, जय मल्हार भक्त मंडळ, सोमनाथ बस्ते,ज्ञानेश्वर बस्ते, प्रल्हाद बस्ते,अंकुश बस्ते, समस्त ग्रामस्थ आप्तेष्ट आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हभपश्री हभपश्री गोविंद आहेर यांनी केले.