नाशिकच्या बोथले नगर येथे तरुणाचा खून. दुचाकीचा पाठलाग करत केला खून.

नासिक पूना रोडवरील उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोथले नगर येथे दुचाकी वरील तीन जणांनी एका मोटरसायकल वरील युवकाचा पाठलाग करून त्याला खाली पाडत धारदार हत्याराने वार करत त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मुत्त युवक याचे नाव तुषार एकनाथ चौरे वय 21 राहणार विनय नगर असे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार चौरे हा बोथले नगर येथील एका दुकानात कामाला आहे तो आणि
त्याचा मित्र दुचाकी ने जात असताना पाठीमागून ट्रिपल सीट आलेल्या तीन संशयितनी तुषार चौरेच्या मोटरसायकलला लाथ मारून खाली पाडले काही काळाच्या आतच सपासपा वार करून ते फरार झाले. दरम्यान तुषार चौरे यांच्या मोटरसायकल वरील दुसरा मित्र चौरेचा मित्र पळून गेल्याने वाचला रात्रीची वेळ असल्याने संशयत युवकांची ओळख पटली नाही दरम्यान भर रस्त्यावर प्रकार घडल्याने बोथले नगर भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे अधिक तपास करत आहे पोलिसांकडून संशयित मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे दरम्यान या घटनेने नाशिक मधील गुन्हेगारी कमी होता होत नसल्याचे दिसून आले आहे.