डायमंड पब्लिक स्कूलची निकालाची परंपरा कायम
डायमंड पब्लिक स्कूलची निकालाची परंपरा कायम
अरुण हिंगमिरे
पत्रकार जातेगांव
नांदगाव
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील डायमंड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी
सालाबाद प्रमाणे उज्वल निकालाची परंपरा कायम राखत घाटमाथ्यावर प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान ह्याही वर्षी मिळवीला आहे, विद्यालयाचे
कु.तेजस प्रशांत पाटील याने 82.33% गुण प्राप्त करून महाविद्यालयातच नव्हे तर केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी श्रद्धा विष्णू बारवकर हिने 74.50% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला.
आकांक्षा चंद्रभान पठाडे हिने 73.17% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे 55 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश प्राप्त केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कॉलेजचे संस्थापक श्री भानुदास घुले, सचिव श्रीमती संगीता घुले, प्राचार्य श्री दीपक घुले त्याचप्रमाणे मुख्याध्यापक श्रीमती शारदा साळुंखे व शिक्षक वृंद आणि शालेय शिक्षण समितीच्या सर्व पदाधिकार्यांनी तसेच बोलठाण ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य, सेवा सोसायटीचे अध्यक्ष व संचालक मंडळाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.