ब्रेकिंग

नाशीक मधील जेलरोड येथे खून. घरात आढळला मृत्यू देह.

“नाशिक जनमत प्रतिनिधी विला आणि काचेचे वार करून तरुणांचा निर्गुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार जेलरोड येथे दुर्गा मंदिरासमोर असलेल्या हेतल हाऊसिंग सोसायटीमध्ये उघडीस आला आहे.

प्रवीण मधुकर दिवेकर वय 43 खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कौटुंबिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. प्रवीण दिवेकर हा मुंबई येथील रहिवासी असून वीस दिवसापूर्वी जेल रोड येथे एकटाच राहण्यास आला होता. मुंबई मद्ये चार महिन्यापूर्वी त्याच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली होती. या कारणातून कुटुंबामध्ये वाद सुरू होते त्यामुळे दिवेकर नाशिक येथे राहण्यास आले होते घटनेच्या आदल्या दिवशी रविवारी दिवेकर यांनी आई-वडिलांना फोन करून खुशाली विचारली होती त्यांना सकाळी आम्ही नाशिकला खरेदीसाठी येत असल्याचे सांगितले होते. दिवेकर यांचे आई वडील मुलाला भेटण्यास आले असता त्यांनी घराचा दरवाजा लोटून पाहिला यावेळी मुलगा घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसून आला. ओरड केलेल्या नंतर नागरिक जमा झाले तात्काळ जवळील हॉस्पिटलमध्ये प्रवीणला दाखल केले डॉक्टरांनी उपचार होण्यापूर्वी त्याला मृत्यू घोषित केले. दरम्यान या घटनेने जेल रोड परिसरात एकच खळबळ उडाली घटनास्थळावर उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाच्या सूचना दिल्या पथकाकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासणी करण्यात आली असून लवकरच आरोपी हाती येतील असे पोलिसांनी सांगितले. आहे दरम्यान घरगुती वादातून हा खून झाल्याचे दिसून येत आहे.तरीदेखील संबंधित युवकाचे कुणाबरोबर वाद होते का हे देखील तपासून बघत आहे लवकरच खुनाचा तपास लागेल. असे पोलीस यंत्रणे कडून सांगण्यात आले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे