आमदार सीमाताई हिरे यांचा अपमान म्हणजे महिला शक्तीचा अपमान. नाशिक जनमत
नाशिक जनमत निमा पावर चां उद्घाटन सोहळा कार्यक्रम यावेळी पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सो सीमा ताई हिरे यांना जी अपमानास्पद वागणूक देण्यात आली. तो महिला शक्तीचां अपमान आहे. आमदार सीमाताई हिरे यांच्या मतदारसंघात हा निमा पावर चा कार्यक्रम असताना त्यांना निमंत्रण देणे निमंत्रण नसताना देखील उद्योजकजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास आल्या . यावेळी त्या स्टेजवरून खाली पडल्या व जखमी झाल्या अशा वेळेस कार्यक्रमाच्या उद्घाटनाची फित कापणे काही वेळ बाजूला ठेवून आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर करत आमदार सीमाताई हिरे यांची विचारपूस करून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेणे महत्वाचे होते किंवा आदरपूर्वक पुन्हा उठवून स्टेजवर घेऊन जाणे महत्वाचे होते. परंतु या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंत्री तसेच निमा अध्यक्ष व इत्यादी प्रतिष्ठित व्यक्तींकडून अशी प्रकारची कृती न केल्या गेल्याने महिला वर्गाच्या भावना दुखवल्या गेल्यात आहे असे नागरिकांमध्ये चर्चा आहे कारण आपल्या भारतीय संस्कृती महिलेला आदिशक्ती म्हटले जाते. महिलेचा आदरपूर्वक सन्मान केला जातो. दरम्यान स्टेजवरून खाली पडल्यानंतरही सो आमदार हिरे उपचारासाठी जात असताना अगोदर उद्घाटनाच्या कार्यक्रमास प्रोत्साहन देणे हे घटनास्थळावर उपस्थित आवळ्याच्या मनात खटका भरणारे होते. सो सीमाताई हिरे या आपल्या मतदारसंघात नावाजलेले व्यक्तिमत्व आहे व त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी मतदारांची मते जिंकले आहेत एकदा नव्हे तर दोनदा त्या मतदारसंघात निवडून आले आहेत. असा थोर महिलेचा अपमान म्हणजे ही शक्तीचा अपमान आहे दरम्यान आयोजक व स्टेज वरून धक्का देणाऱ्या त्या व्यक्तीने माफी मागणे जरुरी आहे असा मतदारसंघातून मतदारांची मागणी आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात संताप व्यक्त होत आहे. जो आमदार सीमाताई हिरे यांचा अपमान म्हणजे श्री शक्ती व भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. असा प्रकार पुन्हा करू नये यासाठी कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रयत्न केला जावा अशी मागणी नाशिक जन्मत करत आहे.