ब्रेकिंग

महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 

 

महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

नाशिक : हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या 483 व्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिक तर्फे सिडको येथील महाराणा प्रताप यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना नेते डि जी सुर्यवंशी, भाजपा शहर अध्यक्ष गिरिष पालवे, स्वराज्य संस्था चे जिल्हा अध्यक्ष अशिश हिरे, भाजपचे जगन आण्णा पाटिल, शैलेश सांळुखे, दातीर ताई शिवसेना, माजी अध्यक्ष जगतसिंग जाधव, राजेंद्रसिंह चौहान, नारायण सिंग पाटील , सजःजनसिंग पवार, मिलिंद राजपूत, जयप्रकाश गिरासे, प्रेमसिंह राजपूत उपस्थित होते.

यावेळी समितीच्या वतीने सर्व मान्यवरांना महाराणा प्रताप यांचा पुतळ्याचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्थानिक रहिवासी जे वर्षानुवर्षण पासून महाराणा प्रताप यांच्या पूर्ण कधी पुतळ्याचे देखभाल करतात अशा नागरिकांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यासोबत येथील सर्व नागरिकांसाठी आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर घेण्यात आले.

या कार्यक्रमास उपाध्यक्ष सविता सिंग, स्वप्निल राजपूत, कोमलसिंग पाटील, भुवनेशसिंग परदेशी, योगेश राजपूत, वीरेंद्रसिंग परदेशी, विजयसिंह परदेशी, नाना जाधव, प्रेमसिंग राजपूत, सुरेखाताई राजपूत, बबीता परदेशी, शुभम टीळे, धनसिंग परदेशी, शैलेश साळुंखे, मीनाक्षी परदेशी, सीमा टिळे यांच्या सह असंख्य समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल परदेशी व मिलिंद राजपूत यांनी केले. जयंती उत्सव अध्यक्ष वीरेंद्र सिंह टिळे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे