आरोग्य व शिक्षण
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे नवीन पॅनल* *नियुक्तीसाठी 10 मे पर्यंत अर्ज सादर करावेत* *:राजेंद्र वाघ*
*विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे नवीन पॅनल*
*नियुक्तीसाठी 10 मे पर्यंत अर्ज सादर करावेत*
*:राजेंद्र वाघ*
*नाशिक,जनमत दिनांक: 24 एप्रिल, 2022*
नाशिक शहर व तालुकास्तरीय न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 25 (3) अन्वये विशेष सहाय्यक अभियोक्त्यांचे नवीन पॅनल नियुक्तीसाठी 10 मे 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत असे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी कळविले आहे.
जिल्हादंडाधिकारी कार्यालयामार्फत त्याबाबतची सूचना व अर्जाचा नमुना www.nashik.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज 10 मे 2023 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टपाल शाखेत सादर करावेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी सांगितले आहे.