करन्सी नोट प्रेस, नाशिकतर्फे *करन्सी नोट प्रेस, नाशिकतर्फे नामको हॉस्पिटलला ९० लाखांच्या डिटेक्शन व्हॅनची भेट*

🙏 *आनंद वार्ता*🙏
नाशिक जनमत. नाशिकतर्फे *करन्सी नोट प्रेस, नाशिकतर्फे नामको हॉस्पिटलला ९० लाखांच्या डिटेक्शन व्हॅनची भेट*
*सीएसआर अंतर्गत करन्सी नोट प्रेसच्या वतीने नामको हॉस्पिटलला ९० लाख रुपये किंमतीची कॅन्सरसह विविध रोगांचे निदान करणारी व्हॅन देण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भाचे पत्र श्री नवीन कुमार साहेब जॉइंट जनरल मॅनेजर ह्यांच्या कडून आज नामको हॉस्पिटलला आज प्राप्त झाले. ही व्हॅन लवकरच नामको हॉस्पिटलच्या सेवेत दाखल होणार आहे. प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, श्री दत्ता गांगुर्डे आणि महापालिकेचे माजी सभापती तथा नामको बँकेचे पदाधिकारी प्रशांत दिवे, बँकेचे अध्यक्ष वसंत गिते, यांच्या सहकार्याने ही व्हॅन मिळाली. नामको ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सचिव शशिकांत पारख व सर्व ट्रस्टी यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि नामको हॉस्पिटलच्या रुग्णसेवेची दखल घेत ही व्हॅन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या एअर कंडिशन्ड मोबाईल डिटेक्शन व्हॅनमध्ये डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, मुलभूत रक्तचाचणी अशा विविध यंत्रणांचा अंतर्भाव असेल. त्यामुळेच या व्हॅनच्या माध्यमातून कॅन्सरसारख्या आजाराने गंभीर स्वरुप धारण करण्यापूर्वीच त्याचे निदान शक्य होणार आहे. याशिवाय टीबीसारख्या आजारांचेही निदान याद्वारे होईल. विशेषतः जिथे प्रभावी आरोग्यसेवा पोहोचलेली नाही किंवा आरोग्यबाबत नागरिक जागरुक नाही, अशा खेडोपाडी, दुर्गम भागासाठी ही व्हॅन अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.*