ब्रेकिंग

शासकीय कार्यालयांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करावे* *:अनिसा तडवी*

*शासकीय कार्यालयांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करावे*
*:अनिसा तडवी*
*नाशिक, दिनांक 06 एप्रिल, 2023
सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी मार्च, 2023 अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) हे 30 एप्रिल, 2023 पर्यंत सादर करावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.

सेवायोजन कार्यालये रिक्तपदांची सूचना देणे सक्तीचे कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतूदी नुसार सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामध्ये अंगीकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच व्यापारी व खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात, अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यवसाय कारखाने यांचा समावेश करण्यात आला आहे. या आस्थापनांनी वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळांची माहिती (ई-आर-1विवरणपत्र) www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर माहे मार्च, 2023 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत सादर करावे.

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर 1) संकेतस्थळावर सादर करतांना दिलेल्या लीस्ट ‘अ’मधील जॉब या पर्यायावर क्लिक करून एम्प्लॉयर लॉग इनमध्ये युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगइन करून ई-आर रिपोर्ट मधील ई-आर 1 या पर्यायावर क्लिक करून माहिती सादर करणे आवश्यक आहे. विवरणपत्र सादर करण्याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत सकाळी 09.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत 0253-2993321 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे