नाशिकला सैदव पाणीदार ठेवण्यासाठी प्रयत्न करा : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह*
*नाशिकला सैदव पाणीदार ठेवण्यासाठी प्रयत्न करा : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह*
*नाशिक, जनमत
नाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानामुळे नाशिक जिल्हा दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. या अभियानामुळे संपूर्ण जिल्हा पाणीदार होवू पाहत आहे. ही गौरवाची बाब असून अशा प्रकारच्या योजना सर्वत्र राबविल्या तर नक्कीच दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरुपी मिटेल, असा विश्वास जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी येथे व्यक्त केला.
नाशिक येथे दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, अभिनेता चिन्मय उदगीरकर उपस्थित होते.
डॉ. सिंह म्हणाले की, नाशिक जिल्ह्याला पाणीदार बनविण्यासाठी येथील प्रशासन प्रयत्न करीत आहे. आम्ही या प्रशासनाशी चर्चा करुन कामकाजाला सुरुवात केली. जिल्हा प्रशासनाकडून ‘चला जाणूया नदीला’ अभियान सुरु केले आहे. या अभियानांमुळे नाशिक टँकर मुक्तीसह दुष्काळमुक्तीकडे वेगाने वाटचाल करीत आहे.
प्रशासनात कार्यरत असलेले सर्व अधिकारी कर्तव्यतत्पर असून ते नाशिक शहराची ओळख स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून वाढवित आहेत. या दोन दिवसात दौऱ्यात मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलो, सर्वजण नाशिकच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.
येथील नदी स्वच्छेतेसह नद्या बारमाई वाहत राहोत, यासाठी ‘चला जाणूया नदीला’ या अभियानातून प्रयत्न सुरु आहेत. नाशिकची ही बदलती ओळख विकासाचा चेहरा आहे. यामुळे येथील नागरिक देखील प्रगतीच्या नवनव्या दिशांकडे वाटचाल करीत असल्याचे डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले.