करंजवण पाणी पुरवठा योजना आणि नियोजित शिवसृष्टीचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मनमाड येथे उद्घाटन.
करंजवण आणि पुरवठा योजना आणि नियोजित शिवसृष्टीचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मनमाड येथे उद्घाटन
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
करंजवण -मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर पुर्ण केले जाईल . पाणीप्रश्न हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.तसेच विविध विकास कामांद्वारे नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते मनमाड येथे नांदगाव
मतदार संघातील करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना आणि नांदगाव येथील नियोजीत शिवसृष्टीच्या कोणशिलेचे अनावर प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या शिंदे यांनी केले, आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस नियोजित पाणी योजना आणि शिवसृष्टीची चित्रफीत उपस्थित मान्यवरांना आणि नागरिकांना दाखविण्यात आली. या प्रसंगी ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी दोन फिरते दवाखाने, दोन रुग्णवाहिका आणि किरकोळ शासकीय कामांसाठी ग्रामीण भागातुन नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयाच्या चकरा बंद व्हाव्या यासाठी दोन
फिरते शासकीय कार्यालय आणि गोरगरीब शेतकरी आणि नागरिकांना काही खोदकाम करावयाच्या असल्यास त्यांना फक्त इंधन भरण्याच्या खर्चावर दोन नवीन जेसीबी उपलब्ध करण्यात आले या सर्व वाहनांचे आणि १५० विकलांग बांधवांना मोफत सायकल वाटप मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या.
या प्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार ,बंदरे व खनिकर्म मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत व नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जे. शेखर पाटील, जिल्हा अधिकारी गंगाधर डी, पोलिस अधीक्षक शहाजी उमप, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, मालेगाव अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, आणि मतदार संघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरील मान्यवरांचे कार्यक्रमास्थळी आगमन होताच वारकरी संप्रदायाने टाळ मृदंगाच्या गजरात त्यांचे स्वागत केले, व सौ.अंजूमताई यांनी मुख्यमंत्री शिंदे, ना. गुलाबराव पाटील, दादाजी भुसे आणि केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांचे औक्षण केले.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी हिंदू, मुस्लिम, शिख इसाई धर्माच्या धर्मगुरूंनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पहार घालून एकत्रित स्वागत केले तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील सर्व धर्मगुरूंचा शॉल देऊन सन्मान केला.
यावेळी बबलू पाटील मनमाड, बाळाकाका कलंत्री नांदगाव, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सभापती व नागापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला, त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुमच्या मनातील सरकार आले आहे. शेतकरी अन्नदात्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून आपण हे सरकार स्थापन केले. करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी १५ टक्के निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या पुर्णत्वाने येथील स्थानिकांना रोज पाणी मिळणार असुन त्यांच्या आयुष्यात बदल घडविणारी ही योजना आहे. या योजनेसाठी निधी कमी पडुन दिला जाणार नाही . मनमाड हे राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. येथील रस्त्यांच्या विकासासाठी राज्याकडुन निधी दिला जाईल.
याप्रसंगी कांदे म्हणाले की माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना मला मोठ्या नेत्याच्या विरोधात जनादेशाने या तालुक्याने आमदार केले आहे, त्यामुळे मी नागरिकांचा देणे लागतो माझ्या शरीरातला शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील आ.कांदे नैसर्गिक पाणी नसल्याने मोठी समस्या, ७० वर्षांपासून चे प्रयत्न वारंवार बैठक घेतल्या तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या कडे २५ चकरा मारल्या उपयोग झाला नाही अशी खंत व्यक्त केली. व
मला तालुक्याच्या विविध विकास योजनांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करतांना तसेच नांदगावच्या जवळपास मोठे रुग्णालय नसल्याकारणाने काही दुर्घटना घडल्यास तात्काळ उपचार न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते तरी नांदगाव तालुक्यात ट्रामाकेअर सेंटर ची मंजुरी मिळावी आणि मनमाड नगर परिषदेच्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी १० कोटींचा निधी मिळावा,नार पार , झाडी येरंडगाव योजनेत पंतप्रधान मोदी यांना सांगून तालुक्याचा समावेश करावा यास इतर विकास कामांबाबत आ. कांदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तुमच्या मनातील सरकार आले आहे.शेतकरी अन्नदात्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून आपण हे सरकार स्थापन केले. करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी १५ टक्के निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या पुर्णत्वाने येथील स्थानिकांना रोज पाणी मिळणार असुन त्यांच्या आयुष्यात बदल घडविणारी ही योजना आहे. या योजनेसाठी निधी कमी पडुन दिला जाणार नाही. मनमाड हे राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.
येथील नगरपरिषदेच्या इमारतीसाठी तात्काळ दिला जाईल तालुक्यातील इतरही विकास कामांना निधी पूर्तता केली जाईल असे आमदार सुहास कांदे यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले व विरोधकांनी जितके आरोप केले त्या आरोपांना आपण विकास कामे करून उत्तर देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांनी तत्वतः मंजुरी दिली होती परंतु नंतर मागे पडले लोकसभा निवडणुकीच्या वेळी नागरिकांनी माझ्या कडे मागनी होती त्यानुसार आंमृत योजनेत प्रस्थाव तयार करण्यात आला होता परंतु केंद्र सरकारकडे राज्याने पाठविला नाही त्यामुळे योजनेला उशीर झाला असे म्हणाल्या.या कार्यक्रमाची सांगता सांगता राष्ट्र गिताने करण्यात आली वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देशमुख यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार साईनाथ गिडगे यांनी मानले.