महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे* *शासनमान्य महाविद्यालयांना आवाहन*
*महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे*
*शासनमान्य महाविद्यालयांना आवाहन*
*नाशिक, दिनांक: 06 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा):*
नाशिक विभागातील शासनमान्य महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झालेले शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्रदान केली जाते.
शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरून ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालयात सादर केले आहेत. परंतु शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित दिसून येत आहेत. विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज नियमानुसार योग्य पडताळणी करून लवकरात लवकर पुढील मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालयाकडे सादर करावेत, अशा सुचनाही सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.