शंकर महादेवन यांच्या मधुर आवाजातील गाण्याने खानदेश महोत्सव वाचा समारोप. खानदेश रत्न पुरस्काराचे वितरण.
नासिक जनमत. जय जय राम कृष्ण हरी. ओंकार स्वरूपा. अशा विविध गाण्यांचे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजातील सुमधुर स्वर लयबद्ध संगीत आणि नावाजलेल्या गाण्यावर नाशिककरांनी ठेका धरत गुलाबी थंडीच्या वातावरणाने महा उत्सवाचा शेवटचा दिवस आकर्षक ठरला. त्यात शंकर महादेवन यांची झलक पाण्यासाठी तुफान गर्दी झाली होती सायंकाळी सहा वाजता शंकर महादेवन यांच्या गाण्यांनी चार दिवसीय कार्यक्रमाचा समारोप झाला. खानदेश संस्कृतीचे स्वतःचे वेगळेपण जपल्याने महाराष्ट्रातील आगळावेगळा हा उत्सव होता या कार्यक्रमात कला सांस्कृतिक व साहित्याची नासिकरांना मेजवानी मिळाल्याने त्यांचा आनंद झाला असे कार्यक्रम नेहमी व्हावे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले खानदेश रत्न पुरस्काराचे वितरण यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले तर गिरीश महाजन यांनी करोनाची भीती टाळण्यासाठी काळजी घ्या असे यावेळी सांगितल्. मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी शेवटच्या दिवशी गर्दी केली होती यावेळी आमदार सीमाहिरे आमदार देवयानी फरांदे महापौर सतीश कुलकर्णी विजय चौधरी लक्ष्मण सावजी गिरीश पालवे बाळासाहेब सानप मनपा आयुक्त पुळकुड वार महेश हिरे केदा आहेर रेशमी हिरे इत्यादी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमात गुजरात भाजप प्रदेश अध्यक्ष सी आर पाटील .तसेच राज्य उत्पादन शुल्क आयुक्त
विजय सूर्यवंशी .पत्रकार दिलीप कोठावदे .संस्कृती नाशिक पाडवा पाहाट चे प्रणेते शाहू खैरे आदर्श शिक्षिका कुंदा बच्छाव .व उद्योजक बुधाजी पानस.रे उद्योजक मनोज कोतकर. अपंग संघटनेचे बाळासाहेब घुगे. संजय धोंडगे महाराज .भाऊ भाषिक गायिका रायमा रजक्क शेख. सागर मटाले. रणजी क्रिकेटपटू सत्यजित बच्छाव.
इत्यादींना खानदेश रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 2022 मधील खानदेश महोत्सव एक नाशिककरांच्या आठवणीतील आदेश महोत्सव ठरला असे मत नाशिककर व्यक्त करत आहे. खाद्य संस्कृती मध्ये अनेक स्टॉलवर विविध पदार्थांची चव घेत खवा यांनी खानदेश महोत्सवात आनंद लुटला.