खानदेश महोत्सवाला नाशिककरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. अहिराणी गाण्यावर नाशिककरांनी केले नृत्य.
नाशिक जनमत नासिक मध्ये सुरू असलेल्या खानदेश महोत्सवामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पाण्यासाठी गर्दी केलेली आहे. काल संध्याकाळी खानदेशी गाण्यावर नाशिककरांचे मस्त मनोरंजन झाले. यावेळी कलाकारांनी नृत्य व गाणे सादर करीत दाद मिळवली. वन्स मोर वन्स मोर आवाजांनी कलाकारांचे मनोधर्य वाढवले .खान्देशचे प्रसिद्ध कलाकार विनोद कुमावत. राणी कुमावत. प्रशांत देसले .मेघा मुसळे. यांनी अहिराणी प्रसिद्ध गाणे सादर करीत दाद मिळवली. नाशिककरांनी स्वतः डान्स करत गाण्यांचाआनंद घेतला .यावेळी आमदार सीमा हिरे रेश्म हिरे व महेश हिरे यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते .कर मना लगीन. वाडी वाडी चंदनवाडी. हाय झुमका वाली सालि.मला यार ना इत्यादी गाण्यांनी नाशिककरांना मोहणी घातली. खानदेश महोत्सवामध्ये फॅशन शो होम मिनिस्टर बाल जत्रा खानदेशी खाद्य महोत्सव आकर्षक विविध प्रकारचे स्टॉल्स लागलेले आहेत हे बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दिनांक 24 रोजी शनिवार
सायंकाळी सहा वाजता नृत्य संध्या फुल दोन धमाल हा कार्यक्रम होणार आहे यामध्ये मानसी नाईक. सुवर्णा काळे. भारत गणेशपुरे .योगेश शिरसाठ. इत्यादी कलाकार सहभागी असणार आहे तसेच उद्या 25 12 22रोजी खानदेश महोत्सव कार्यक्रमांमध्ये शंकर महादेवन लाईव्ह येणार आहेत तसेच खानदेश रत्न पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे नागरिकांनी या कार्यक्रमाचा मोठ्या
प्रमाणामध्ये लाभ घ्यावा असे आयोजक आमदार सीमाताई हिरे महेश हिरे व सौ रेशमी हिरे यांनी आवाहन केले आहे