सिडकोत गुन्हेगारी थांबता थांबेना. रात्री उत्तम नगर येथे गोळीबार .अंबड पोलीस स्टेशन पुढे गुन्हेगारी थांबवण्याचे आव्हान
नाशिक जनमत आरपीआय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर काल रात्री अकरा वाजेच्या दरम्यान उत्तम नगर भागांमध्ये अज्ञात ईसमान कडून गोळीबार करण्यात आला यात ते जखमी झाले असून दोन गोळ्या त्यांच्या माडिला लागले आहे. सिडकोतील उत्तम नगर भागातील गाड्या फोडण्याची व दहशत निर्माण करण्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा सिडकोत गोळीबार झाल्याने सिडको तील नागरिक दहशतीखाली आहे. महानगरपालिका च्या निवडणुका समोर आल्या असताना गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात डोकेवर काढत आहे . पोलिसांतर्फे गस्तअंबड पोलीस स्टेशन तर्फे सर्व प्रकारच्या उपाययोजना करून देखील गुन्हेगारी थांबता थांबेना गुन्हेगार पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र सिडकोमध्ये निर्माण झाले आहे. सिडको प्रमाणे नाशिक शहरात देखील गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. पोलिसांतर्फे गस्त वाढविण्याची गरज निर्माण झालेली आहे येणारे पुढील दोन-तीन महिने पोलीस साठी गुन्हेगारी थांबवण्यासाठी आव्हानात्मक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे दरम्यान प्रशांत जाधव यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे.