माजी सैनिकांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये पदभरतीची संधी*
*माजी सैनिकांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये पदभरतीची संधी*
*नाशिक, दिनांक 24 फेब्रुवारी, 2024 नाशिक जनमत वृत्तसेवा):*
माजी सैनिकांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे नऊ ट्रेडसाठी एकूण 72 पदांची भरती करण्यात येणार आहे. ज्या इच्छुक माजी सैनिकांना या भरतीचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण या कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी केले आहे.
या भरतीसाठी जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.
*पदभरतीचे नऊ ट्रेड खालील प्रमाणे*
• मेकॅनिकल – 35 पदे
• इलेक्ट्रिकल – 24 पदे
• इलेक्ट्रॉनिक्स – 02 पदे
• इन्स्ट्रुमेंटेशन – 02 पदे
• कम्युनिकेशन – 01 पदे
• मेटेरोलॉजी – 01 पदे
• एरोड्रोम – 01 पदे
• सिक्युरिटी गार्ड – 05 पदे
• फायरमॅन – 01 पदे