दारणा काठी दोन बिबटे जेर बंद. अजूनही बिबट्याचा वावर असल्याची नागरिकांनची चर्चा.
दारणाकाठी दोन बिबट्या जेर बंद.
देवळाली कॅम्प ।नाशिक जनमत. नाशिक शहराच्या अवतीभवती असलेल्या डोंगर दर्या मधून आता शहरी भागाच्या आजूबाजूला असलेल्या शेती परिसरामध्ये बिबटे लपून बसत गाई वासरा व कुत्रे यांची प्रामुख्याने बिबटे शिकार करत आहेत. दारणाकाठानजीकच्या
शिवारात नुकतेच दोन बिबटे जेरबंद झाले, • मात्र अजूनही या भागात बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांत भीती आहे. देवळाली कॅम्पच्या बार्न्स स्कूल परिसरासह लहवित आणि दारणाकाठी बिबट्यांचे दर्शन होत आहे. जनावरे, वासरांना बिबटे लक्ष्य करतात. बार्न्स स्कूलरोडवरील डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात प्रवेश करत त्यांच्या पाळीव हल्ला केल्यानंतर वनविभागाने तातडीने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे दरम्यान अजूनही या भागातील शेतकरी वर्ग व नागरिक दिवसा व रात्री बाहेर पडण्यास घाबरत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत आजही कायम आहे.